शेतजमिनीचे फेरकार करण्यासाठी केली लाचेची मागणी
चंद्रपूर : खरेदी केलेल्या शेतजमिनीचे फेरफार करून देण्यासाठी पैसाची मागणी करण्याऱ्या भद्रावती येथील मंडळ अधिकाऱ्यास 1500 रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरूवारी (1 एप्रिल) ला केली केली आहे. प्रशांत नरेद्रप्रतापसिंह बैस (51 वर्ष ) असे लाचखोर आरोपी मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील निवासी तक्रारदार यांनी, साझा चंद्रनखेडा मौजा चरूर घारापुरी येथील सर्वे नं . 12 9/2 मधील 1 हेक्टर 62 आर जमीन खरेदी केली होती. सदर जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता तक्रारदार यांनी तहसिल कार्यालय येथे रितसर अर्ज केला होता. या कामासाठी तक्रारदार हे तहसिल कार्यालय भद्रावती येथील मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांना भेटले. त्यांनी तक्रारदाराचे जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता 2 हजार रूपयाची मागणी केली होती. तक्रारदाराची मंडळ अधिकारी प्रशांत बैस यास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भेटुन तक्रार नोंदविली.
प्राप्त तक्रारीनुसार पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे यांनी, अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचून कारवाई करण्यासाठी नियोजन केले. आज गुरूवारी 1 एप्रिल 2021 रोजी पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांनी तक्रारदाराचे जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता 2 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 1500 रूपये रक्कम स्विकारली. रक्कम स्विकारताना मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रथकाने रंगेहात पकडले.
आरोपी मंडळ अधिकारी बैस यांचेविरोधात पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक मिलींद तोतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, पोहवा मनोहर एकोणकर , नापोकॉ अजय बागेसर, संतोष येलपूलवार, पो.कॉ रोशन चांदेकर, रवि ढेगळे , समिक्षा भोगळे सतिश सिडाम आदींच्या पथकाने कारवाई केली.