भवानजीभाई शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला अटक

0
868
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : येथील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने येथीलच विद्यार्थीनीचा विनंयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. हितेश मडावी असे आरोपी शिक्षकाचे नाव असून या घटनेने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त केल्या जात आहे. विद्यार्थीनीच्या पालकाने केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत आज गुरूवारी (1 एप्रिल) ला ही कारवाई केली आहे.

पोलिस सुत्रानुसार, कोरोना आजाराच्या काळात ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. यारिता स्मार्टफोन द्वारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करीत आहे. अशातच ग्रामीण भागातील मुली ह्या शहरातील वस्तीगृहात येवून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. चंद्रपूर शहरात नामांकित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथील शाळेतही ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू आहे. याच शिक्षणाचा गैरफायदा घेऊन काही शिक्षक विद्यार्थींनीना त्रास देत आहेत.

आरोपी शिक्षक हितेश मडावी याचेकडून ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर एका विद्यार्थीनीला अश्लिल संदेश, अश्लिल फोटो पाठवून त्रास दिले जात होते. एवढेच नव्हे तर फोन करून त्या विद्यार्थिनींना छळल्या जाज होते. मात्र सदर शिक्षकाच्या बेताल वागण्याला सदर विदयार्थीनीने कोणतीही भिक न घातल्याने दोन शिक्षकांनी रंगपंचमीच्या दिवशी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जावून चांगलाच धिंगाणा घातला. या घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनींनी पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेचे मुख्याध्यापकांकडे आणि रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आज गुरूवारी विविध कलमान्वये शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी हितेश मडावी ह्याला अटक करण्यात आली. चंद्रपूरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त केल्या जात आहे.