गाव नमुना ८ (अ) व गावठाणाच्या मालमत्ता विक्रीसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

घुग्घुस : परिसरातील नागरिकांची गाव नमुना ८ (अ) वर नोंदणी आहे. त्यांना मालमत्ता विक्रीसाठी घुग्घुस नगर परिषदेने प्रमाणपत्र द्यावे तसेच ज्यांची मालमत्ता गावठाणा येथे आहे त्यांना सुद्धा आपली मालमत्ता विक्रीसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना निवेदनातून केली आहे.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 50,000 हजाराच्या जवळपास आहे. नगर परिषद हद्दीतील अनेक नागरिकांची मालमत्ता गाव नमुना ८ (अ) वर नोंदणी आहे. तसेच गावठाण येथे आहे परंतु प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना आपली मालमत्ता विक्रीसाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेऊन निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माजी जि.प. सभापती नितुताई चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे, साजन गोहणे, अनंता बाहादे, निरंजन डंभारे, राजेंद्र लुटे, मंगेश पचारे, असगर खान, सतीश कामतवार, निरंजन नगराळे, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleOBC आरक्षणासाठी एक दिवसाचे स्वतंत्र आधिवेशन घेणार : विजय वडेट्टीवार
Editor- K. M. Kumar