काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष होणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन
• चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सभासद नोंदणी शुभारंभ

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेच्या कल्याणासाठी नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षावर मोठ्या संख्येने नागरिक प्रेम करतात. काँग्रेस पक्षाने सभासद नोंदणी सुरु केली आहे. सभासद नोंदणीच्या माध्यमातून काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आज सोमवारी (१नोव्हेंबर ) ला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकारातून आयोजित सभासद नोंदणी शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी, चंद्रपूर शहर जिल्ह्यात सर्वाधिक सभासद नोंदणी करण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, के. के. सिंग, अश्विनीताई खोब्रागडे, घनश्याम मुलचंदानी, भास्कर माकोडे, चंदा वैरागडे, गोपाल अमृतकर, प्रवीण पडवेकर, सोहेल शेख, राजेश अडूर, प्रमोद बोरीकर, सतीश लहामगे, केशव रामटेके, स्वाती त्रिवेदी, साबीर सिद्दीकी, कृपाल रामटेके, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, नौशाद शेख, एजाज रिजवी, पप्पू सिद्दीकी, युसूफ भाई, अल्ताफ अली, राज यादव, इरफान बाबा शेख, गोविंदा अमृतकर, अंकुर तिवारी, अमित खोब्रागडे, मनीष तिवारी, स्वप्नील केळझरकर, गौस खान, सलीम शेख, इमरान शेख, पितांबर कश्यप, सलमान खान, एजाज अली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.