एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात विद्यार्थी अडकले चंद्रपुरात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था
• बस उपलब्धकरून स्व:गावी केले रवाना

चंद्रपूर : आरोग्यविभागाच्या ड वर्गाच्या परीक्षा रविवारी 31 आॅक्टोबर ला घेण्यात आल्या, परंतु राज्य शासनाच्या घोळात व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात परीक्षार्थी भरडले गेलेत. राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने चंद्रपुरात आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी बसेस उपलब्ध न झाल्याने नसल्याने परिक्षार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

काल रविवारी साडे चार वाजता परीक्षा संपल्या नंतर सायंकाळी जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थी चंद्रपूर बसस्थानकावर परळी, नांदेड, आदीलाबाद, यवतमाळ येथे जाण्यासाठी जमा झाले. जे आपल्या साधनाने चंद्रपुरात दाखल झाले, मार्ग पकडला. परंतू परंतु दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांची व्यवस्था न झाल्याने ते रात्री दहा पर्यंत बस्थानाकावर ताटकळत बसलेत. अश्यातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांना परीक्षार्थी बसस्थानकावर अडकले असल्याची माहिती मिळताच त्यांनी बसस्थानकावर येवून परिक्षार्थ्यांची भेट घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयाच्या विविध संघटना, मंत्री, आमदार, खासदार, आरटीओ, व जिल्हाधिकार्यांना मदतीची आव्हान केले परंतु जेवणाची व गावी जाण्याची कोणतीही मदत करू शकले नाही. त्या विद्यार्थ्यांना मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह यांनी स्वखर्चाने परिक्षार्थ्यांची रात्रीच जेवणाची व्यवस्था करून भूक भागविली तर पहाटे ३ वाजता बसची व्यवस्था करून त्यांना गावाला रवाना करण्यात आले. सर्व परिक्षार्थींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहजाद सय्यद, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्राम.पं. सदस्य नितीन टेकाम, करण नायर,अनिल राम, रोहित घोरपडे, तुषार येरमे,भीम यादव उपस्थित होते.