वर्धा जिल्ह्यातील “कोरा” ग्रा.पं.सदस्य व त्यांच्या कुटुंबातील नाव “कोरपना” मतदार यादीत

0
205
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोरपना मतदार यादी आश्चर्यजनक
• खोटे कागदपत्र जोडून शासनाची केली फसवणूक
• तहसीलदारांकडे केली पोलीस कार्यवाईची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या तालुका कोरपना नगरपंचायतची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली असून यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेते आपापल्या परीने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विविध प्रकारच्या आरोप प्रत्यारोप, वादविवाद सुरू असतानाच येथील मतदार यादीत समाविष्ट बोगस नावांचा मुद्दा कमालीचा गाजत आहे.याविषयी मागील ८ महिन्यापूर्वी तक्रार केल्याने अंदाजे ३०० च्या जवळपास बोगस मतदारांची नावे तहसीलदार साहेबांनी वगळले होते.यामुळे बोगस नावांचा भरवश्यावर निवडून येण्याच्या बेतात असलेल्यांचे धाबे दणाणले.

मात्र आता नगरपंचायतची निवडणूक जवळ येताच पुन्हा जानेवारी महिन्यात अॉनलाईनचे परत अंदाजे २५० बोगस नाव यादीत समाविष्ट करण्यात आले असून यात आश्चर्य म्हणजे एकच की,महाराष्ट्रात जानेवारी २०२१ मध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पारपडल्या.याच श्रेणीत वर्धा जिल्ह्यातील ता.समुद्रपूर येथील “कोरा” येथेही ग्रामपंचायत निवडणूक झाली.यात येथील वार्ड क्रमांक ४ मधून “पंढरे शिरीष रामभाऊ” यांनी कढाई या चिन्हावर निवडणूक लढली आणि जिंकली आज घडीला तो ग्रा.पं.सदस्य आहे.याच कालावधीत पंढरे व त्यांच्या कुटुंबातील लोकांचे नाव चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील वार्ड क्रमांक ६ या मतदार यादीत २७७ क्रमांकावर समाविष्ट आहे.शिरीष पांढरे व त्यांच्या कुटुंबाचे कोरा येथील मतदार यादी,कोरपना येथे नाव समाविष्ठ असलेली मतदार यादी, पांढरे यांनी ग्राम पंचायत मध्ये निवडणूक लढविताना तयार केलेले बॅनर हे सम्पूर्ण पुरावे सुनील देरकर यांच्याकडे उपलब्ध असून पंढरे व त्यांच्या कुटुंबातील यांनी याठिकाणी नाव समाविष्ट करताना खोटे कागदपत्र जोडुन शासनाची फसवणूक केली असल्याने सदर व्यक्तीवर पोलीस कार्यवाई करण्याबाबत मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन दिले असून मा तहसीलदार यांनी लगेचच कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले आहे यावर काय कार्यवाई होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.