चंद्रपूरचे तापमान ४३.८ अंशांवर ;  विदर्भातील पारा सातत्याने चढतोय

0
100
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : विदर्भात सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली असून संपूर्ण विदर्भात चंद्रपुरचे तापमान हाॅट ठरतोय. पूर्व भागातील चंद्रपूर येथे आज कमाल तापमान ४३.८ अंश इतके होते. तर, सर्वात कमी म्हणजे ३८.०अंश इतक्या तापमानाची नोंद बुलढाणा येथे झाली आहे. तीन दिवसांपूर्वी चंद्रपूर ४३.६ अंशावर होते. आज परत चंद्रपूरच्या तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे.

चंद्रपूर पाठोपाठ ब्रह्मपुरी चांगलाच तापला असून येथील तापमान ४२.१ अंशनोंद करण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, आज शुक्रवारी विदर्भातील संपूर्ण जिल्ह्याच्या तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यात चंद्रपुरात ४३.८अंश तर ब्रम्हपुरी येथे ४२.१ अंशांची नोंद झाली. अन्य शहरात अकोला येथे ४१.६ अंश, अमरावती ४०.४ अंश, गडचिरोली ४१.२ अंश, गोंदिया येथे प्रत्येकी ३९.२ अंश, नागपूर येथे ४०.६ अंश, वर्धा ४०.५ अंश, तसेच यवतमाळ येथे ४०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात उष्णतेची लाट निर्माण झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.