त्या कारकूनाच्या दबंगशाहीने वैद्यकीय अधिकारी त्रस्त ?

चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील कारकून महेश अगडलवार यांच्या मनमानी व दबंगगिरीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे शारीरिक, मानसिक,व आर्थिक रित्या त्रस्त झाले आहेत. 2019 जून ते ऑक्टोबर 2019 मधल्या काळात वैद्यकीय अधिकारी यांच्या मासिक वेतनातून कमी करण्यात आलेल्या रकमेची अजून पर्यंत थक्कबाकी मिळाली नाही.

याला मुख्य कारण म्हणजेच कारकूनाला “चिरीमिरी” दिली नाही. जुन्या रकमेचा घोळ अजून सुटला नसतांना जून 2021 च्या वेतनातून आठ हजार रुपये कपात केली.

याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी विचारणा केली असता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी फोन द्वारे कपातीचा आदेश दिला असे सांगितले मात्र वास्तविक पाहता तालुका आरोग्य अधिकारी यांना रक्कम कपातीचा अधिकारच नाही.

यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे सूचना न देता परस्पर त्रास देण्याच्या कुटील द्वेषपूर्ण मानसिकतेतुन सदर रक्कम कपात केली. या संपूर्ण प्रकरणा बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वाकदकर यांनी विचारणा केली असता त्यांनी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले विना अधिकार कोरोना योध्दाला हेतुपूर्वक त्रास देत असलेल्या कारकुना विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली आहे. आता ह्या दबंगशाही करणाऱ्या कारकुनावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.