पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंद्रपूर चा मदतीचा हात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मदत साहित्याच्या ट्रकला दाखविला काँग्रेसचा झेंडा

चंद्रपूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुरामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून  पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘मदतीचा एक हात’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा उपक्रम महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात राबवण्यात आला.

आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थित पुरग्रस्तांसाठी मदत सामग्री भरलेला ट्रक जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालातून पुणे येथील काँग्रेसच्या टिळक भवनात पाठवण्यात आला.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी या टेम्पोला काँग्रेसचा झेंडा दाखवून मदत साहित्य भरलेला ट्रक पुण्याकडे रवाना केले. चंद्रपूर शहरातून या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. संपुर्ण एक आठवडा हा उपक्रम राबवण्यात आला. लोकसहभागातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली. सर्व जीवनावश्यक साहित्य, कपडे, खाद्य पदार्थांचे पॉकेट्स, धान्य किट्स या सर्व साहित्यांचा समावेश या ट्रक मध्ये असून संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर जिह्यातून सर्वाधिक साहित्य या उपक्रमाद्वारे पूरग्रस्तांना पाठवण्यात आले. महिला काँग्रेसच्या या उपक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस चे अध्यक्ष प्रकाश देवतळे, सिद्धिविनायक सामाजिक प्रतिष्ठान यांनी देखील मदतीचा हात दिला.

राजूरा महिला काँग्रेस व बल्लारपूर महिला काँग्रेस ने देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा अनुसूचित विभाग, युवक काँग्रेस, महानगरपालिकेतील नगरसेवक, या सर्वांनी या उपक्रमाला साथ दिली. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य- ठेमस्कर, जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे,राजुरा महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्षा कविता उपरे,  शहर अध्यक्षा संध्या चांदेकर, बल्लारपूर तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, शहर अध्यक्षा मेघा भाले, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सदस्य लता बारापात्रे, नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेवक नंदु नागरकर,नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका विना खनके, नगरसेविका सकिना अन्सारी, सुनीता अग्रवाल अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, विनोद संकत महानगर जिखध्यक्ष असंघटित कामगार विभाग,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, अनुसूचित विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष पवन अगदारी, जिल्हाउपाध्यक्ष सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर,  शहर अध्यक्षा शालिनी भगत,बेबी सोंडोले महासचिव, किरण जुनघरे सचिव, पार्वती पिवाल, अनिता दातार, वदंना भागवत, आशा रामटेके,माजी महापौर संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर,रुचित दवे,रामीज शेख, राजेश अडुळ, संदीप सीडाम, प्रमोद बोरीकर, अनिल फाले, ईश्वर मुसळे गणेश दिवसे, हरीश कोत्तावार, हाजी अली, मतीन कुरेशी, सुनील चौहान, ऐजाज कुरेशी, ब्रिजेश,परवीन सययद, सिद्धिविनायक सामाजिक प्रतिष्ठान च्या सोनल देवतळे, स्नेहा दीक्षित, अश्विनी मत्ते, ममता जुनघरे यांची उपस्थिती होती.