घुग्घुस मतदार यादीत बोगस मतदारांचा सुळसुळाट 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नगरपरिषद निवळणुकी पूर्व यादी दुरुस्ती होईल काय ?

चंद्रपूर : जिल्ह्यतील ‘मिनी इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या औद्योगिक घुग्घुस शहरात गेल्या आठ दशकांपासून कोळसा खाणी, सिमेंट कंपनी, स्पंज आयर्न यांसारख्या उद्योगांमूळे देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक याठिकाणी वास्तव्यास आहे. अठावन्न वर्षांपूर्वी उदय झालेली ग्रामपंचायत करवसुलीतही जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. असे असताना गेल्या सतावीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाविकास आघाडी शासनाचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी 31 डिसेंम्बर 2020 रोजी नगरपरिषदेचा दर्जा दिला.

घुग्घुस शहर दोन भागांत विभाजीत असून लोकवस्ती व वेकोली वसाहत असे दोन प्रमुख भाग आहेत. तर एकुण सहा वॉर्ड आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत तत्कालीन सत्तापक्षाने त्यांना अनुकूल होईल, अशा पद्धतीने वॉर्ड फॉर्मेशन करून वस्तीचा भाग कॉलनीत समाविष्ट केला व आपल्या कट्टर समर्थकांची नावे अनेक वॉर्डाच्या मतदार यादीत समाविष्ट केली. यामध्ये मोठया राजकारण्यांचे कुटुंब ही सहभागी आहेत. यामुळे वस्ती भागातील मतदारांची तारांबळ उडाली. अनेक मतदारांची नावे यादीतुन हेतुपूरस्सर गहाळ करण्यात आली.

घुग्घुस परिसरातील शेंणगाव, उसगाव, महातारदेवी, नकोडा, चंद्रपूर, शिवणी, कैलासनगर येथील जवळपास पंधराशे बोगस मतदारांचा घुग्घुसच्या मतदार यादीत समावेश असल्याची शंका असून त्यावेळी यांना मतदानात मिळणारी लीड हे यांच्याच भरवश्यावर मिळत होती अशी चर्चा आहे.

याव्यतिरिक्त कोळसा खाणी, सिमेंट उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचारी आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश यांसह अन्य राज्यांतील लोकांचाही मतदार यादीत समावेश असून वर्ष 2011 जनगणने नुसार शहराची लोकसंख्या ही 32,654 इतकी होती. यापैकी अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक शहर सोडून गेले. त्यांची नावे आजही यादीत आहेत. आता तर लोकसंख्याही दुप्पट झाली आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील हा गोंधळ दूर होतो की मतदारांना मतदान केंद्रांसाठी भटकंती करावी लागते हा येणारा काळच सांगेल !