आ. जोरगेवार यांचा दणका, खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा भरण्यास मंजूूरी

0
353
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सर्व साधारण गटातीलही जागा भरण्याच्या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 5 जानेवारीला नागपूर सीएमडी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणक्या नंतर  खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा भरण्यास वेकोली प्रशासनाच्या वतीने मंजूूरी देण्यात आली आहे. मात्र या जांगासह सर्व सर्वसाधारण पदांची भरती प्रक्रियाहि राबवत माईंनिकचे प्रशिक्षण घेऊन नूकतेच उत्तीर्ण झालेल्यांसाठीही जागा काढण्यात याव्यातअशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात  5 जाणेवारीला नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
नागपूर वेकोली विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुन सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही.  जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे इथे काम करणाऱ्या  युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोली प्रशासनाकडून  २०१८ पासून मायनिंग मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अदयापही नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली आहे. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रिये अभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. त्यातच हैद्राबाद येथे हि भरती प्रक्रिया राबवून तेथील युवकांना येथे नियुक्ती करण्याचा कट रचल्या जात आहे.

         त्यामुळे नागपूर वेकोली अंतर्गत येणा-या कोळसा खानीतील माईनिंग सरदार व ओव्हरमेन पदाच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात अन्यथा नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ईशारा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने देण्यात आला होता. याची दखल घेत वेकोली प्रशासनाच्या वतीने माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा काढण्यास मंजूरी दिली आहे. मात्र या जागा खात्या अंतर्गत भरण्यात येणार असल्याने नुकतेच माईनिंगचे प्रशिक्षण घेऊन उत्तिर्ण झालेल्या युवकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2018 पासून वेकोली तर्फे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामूळे अगोदरच या विभागाशी संबधित शिक्षण घेतलेला युवक चिंतीत आहे. आता खात्या अंतर्गत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामूळे खात्या अंतर्गत भारतीसह सर्वसाधारण गटासाठीही भरती प्रक्रिया राबवत फ्रेशिअर युवकांनाही नौकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी 5 जाणेवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने  नागपूर येथील सि.एम.डि कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह पदविप्राप्त माईनिंग सरदार यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.