अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशनने वाढविला महिला बचत गटांचा आत्मविश्वास

0
160
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
सातत्याने महिला बचत गटांना मार्गदर्शन व साहाय्य करून अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेयर फाऊंडेशनने त्यांचा आत्मविश्वास घट्ट केला व त्यांना स्वतःच्या पायावरती खंबिरपणे उभे राहण्यास शिकविले.

नांदा फाटा ( चंद्रपूर) : शनिवारला सी. एस. आर. ऑफिस मध्ये अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन चे उपाध्यक्ष माननीय संजय शर्मा सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली, या सभेला क्रिष्णा महिला बचत गट, सांगोडा, धनलक्ष्मी महिला बचत गट, बीबी, वीरांगना स्वयंसहायता बचत गट, नांदा व ऊन्नती स्वयंसहायता बचत गट, नोकारी यांचा समावेश होता. मार्गदर्शनात माननीय संजय शर्मा साहेब यांनी बचत गटांनी बनविलेल्या साहित्याची विक्री अधिका-अधिक कशी करता येईल हे उदाहरणासह बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले. या सभेला सचिन गोवारदीपे, देविदास मांदाळे व सचिन देवघरे यांची सुद्धा उपस्थिती होती.

बचत गटातील महिलांनी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले व त्यांनी सांगितले की आमच्या यशामागे तुमचा नेहमी सहभाग राहिला तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज आत्मविश्वासाने उभे आहोत.

विशेष म्हणजे आम्ही पहिले चार साहित्य बनवत होतो आता तेच जवळपास 15 साहित्यवरती पोहोचले आहे व आमची महिन्याची विक्री सुद्धा वाढली आहे.

साहित्यात – अगरबत्ती, धूप अगरबत्ती, फिनाईल, भांड्याचे लिक्विड, चाय पत्ती,निरमा,हलदी पावडर,मिरची पावडर,पेपर बँग, कापडाची थैली , नोस मास्क , लिफाफा, मोहाचे लाडू, तिळ गुड लाडू, प्रसाद दाना, हलवा यांचा समावेश आहे व त्यांना विक्री करण्याकरिता ते को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ए .सी. डब्ल्यू. आवारपुर मध्ये विक्रीकरिता