क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्र्यांना निवेदन 

0
192

चंद्रपूर : जिल्ह्यात पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे प्रथम आगमना निमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अमराई वॉर्ड क्रं.01 मधील प्रस्तावित नियोजित क्रीडांगणाचे बांधकाम तातळीने करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. येथील अमराई वॉर्डातील बहादे ले – आऊट हे परिसरातील मुलां साठी युवकां साठी हे एकमेव खेळाचे मैदान असून मुलं येथे क्रिकेट, व्हॉलीबॉल, सायकल चालविणे व अन्य खेळाचे सराव करीत असतात.

यासोबतच पोलीस भर्तीचे सराव, वॉकिंग, रनिंग आदीसाठी ही हा मैदान महत्वपूर्ण ठरणार असल्याने कृपया या मैदानाचे सुसज्ज अश्या क्रीडांगणात तातळीने रूपांतर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रफुल हिकरे, सचिन कोंडावार, संपत कोंकटी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते