मोहफुल वेचायला गेलेला इसम वाघाच्या हल्यात ठार

0
462
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सिंदेवाही तालुक्यातील घटना; आठवडाभरातील दुसरी घटना

चंद्रपूर : दरवर्षी उन्हाळ्यातील काही दिवस जंगल परिसरातील गावातील नागरिक मोहफुल वेचण्याचा व्यवसाय नित्याने करतात. त्यामध्ये त्यांना थोडीफार आर्थीक मदत होते. परंतु काही दिवसांपासून मोहफुल वेचून कुटूंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी शेजमजूरांवर सध्या वाघोबांमुळे संकट ओढवले आहे. आज शनिवारी सिंदेवाही तालुक्यातील सिरखाडा गावातील 55 वर्षीय इमस वाघाच्या हल्यात ठार झाला आहे. श्रीधर आत्राम असे मृताचे नाव आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. तिन दिवसापूर्वीच मुल तालुक्यातील एक महिला याच पध्दतीने मृत्यू पावल्याची घटना ताजीच आहे.

आज शनिवारी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील शिवणी जंगल परिसरात सिरखाडा येथील श्रीधर आत्राम हो व्यक्ती मोहफुल गोळा करण्यास गेला होता. बराच वेळ तो घरी न परल्याने त्याचीशोधाशोध केली असता त्याचा मृतदेह शिवणी जंगल परिसरात आढळून आला. सर्व प्रथम काही नागरिकांना या घटनेची माहिती झाल्याने त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनतर वनविभागाला माहिती देण्यात आली. लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

चंद्रपूर जिल्हयातील बराचसा भाग हा जंगलव्याप्त आहे. ताडोबाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी नागरिक मोहफुल वेचून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्या मिळकतीतून आपल्या गरजा पूर्ण करतात. परंतु जंगलामध्ये वाघांच्या उच्छांदामुळे मोहफुल वेचायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोविड सारख्या स्थितीत हाताला काम नाही. त्यातच दरवर्षी हा मोहफुलाच्या माध्यमातून थोडीफार मिळकत होते. परंतु आता वाघोबाचे संकट आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोहफुल वेचालया जाण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. आठवडाभरात ही दुसरी घटना आहे. मुल तालुक्यातील आगडी जंगलपरिसरात महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना ताजीच आहे. वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करून मृताच्या कुटूंबियांना भरघोष मदत करण्याची मागणी होत आहे.