यंग चांदा बिग्रेडच्या वतीने विविध क्षेत्रातील पारंपारिक गुरुंचा सत्कार
चंद्रपूर : बालपणापासून तर सार्वजनिक जिवना पर्यंतच्या प्रत्येक वाट यशस्वीतेकडे वळविण्यासाठी गुरुंचे मार्गदर्शन गरजेचे आहे. गुरु शब्द एक असला तरी त्याचे रुप अनेक असून आजची परिस्थिती पाहता स्वयंरोजगाराचे धडे देणारा गुरु समाजाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने बाबूपेठ येथील महादेव मंदिरात पारंपारीक गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवरावजी पिंपळकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, महिला ग्रामीण संघटिका सायली येरणे, मारोतराव मत्ते, बल्की, डॉ. धाबेरे,यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशिद हुसेन, विश्वजित शहा आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आजच्या स्पर्धेच्या युगात नौकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामूळे स्वयंरोजगाराकडे वळणे काळाजी गरज झाली आहे. अशात योग्य गुरूंची गरज आहे. यात व्यवसायात प्राविण्यप्राप्त अनेकजन आपले कलागूण दुस-यांना देत स्वावलंबी बनवत आहेत . अशा ज्ञाणाचे भंडार असलेल्या गुरुंची समाजालाही गरज असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जिवणात यशस्वी व्हायचे असेल तर गुरुच्या मार्गदर्शनाची गरज असते. अंधकार दूर करणारा” सत्याचा मार्ग दाखवणारा, चांगलं- वाईट शिकवणारा, समाजामध्ये वागायला शिकविणारा म्हणजेच आपल्या आयुष्याला योग्य ते वळण व मार्ग दाखविणारा व्यक्ती म्हणजचे गुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज आयोजीत पारंपारीक गुरुंचा सत्कार कार्यक्रम म्हणजे आजवर या गुरुंनी आपआपल्या क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची पावती आहे. मुर्तीकार, शिवणकाम करणारा, चित्रकार, पेंटर व आज येथे सन्मानीत झालेले सर्व कलाप्रेमी गुरु अनेकांना रोजगार देण्याचे काम करत आहे. त्यामूळे अशा गुरुंचा गौरव झालाच पाहिजे, यंग चांदा ब्रिगेडने हा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करुन त्यांना योग्य न्याय देण्याचा आपला संकल्प आहे. त्या दिशेने यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही प्रामाणीकपणे काम करत असल्याचे समाधानही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. यावेळी, पेंटर, अब्बासभाई शेख, सुतार, गणेश तातरकर, वेल्डर, गोकुल हलदर, एरोबिक प्रशिक्षिका, स्वीटी शेख, ट्रक चालक, सोनू बनकर, ट्रक मेकॅनिक, जावेद रशीद काझी, आत्मरक्षक शिक्षिका, मयुरी तलांडे, आटो चालक, वसंता लोहेकर, जिम ट्रेनर, राज अटकपुरवार, कॅटरिंग वेटर, नंदलाल रहांगडाले, वकील प्रशिक्षक मुकुल टंडन, कॅटरिंग महिला, छाया उपरे, इलेकट्रीशियन संजय गेडाम, घंटागाडी, वनिता गायकवाड, आशा वर्कर, अंजली कोलतेकर, अंगणवाडी सेविका, कोकिला कुंभारे, दाइमा, अरुणा समनपलीवार, संस्कार वर्ग प्रशिक्षक, देवश्री देशमुख, विकलांग मुलांची मार्गदर्शिका, नीलिमा दीक्षित, अनाथ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर प्रशिक्षिका, चैताली खट्टी, मूर्तिकार, किशोर देशेट्टीवार, मूर्ती पेंटर, रमेश अम्रोजवार, मच्छीपालन, शंकर विश्वास, गाय पालन, राधेशाम मोरे, पार्लर प्रशिक्षण, स्नेहल देशमुख, मोबाईल रिपेरिंग, प्रकाश ढालणे, शास्त्रीय संगीत, केशव बल्लावार, फेटे बांधणेवाला, सचिन नंदुरकर, मंडपवाला, मारोती भुजकर, संगीत प्रशिक्षण, चतुर्भुज चाफले, क्रीडा, सुरज परसूतकर, नाटक दिग्दर्शक, अनिरुद्ध वनकर, बँड प्रशिक्षक, दीपचंद्रराव डोंगरे, मटका कुंभार, सुरेश अटकापुरवार, शिवणकला, प्रभा भैरव, बुटीक, शारदा तुमराम, झुबा, गोपाल मुंदडा, केक, कलाम अन्सारी, योग शिक्षक, देवराव वांढरे, भजन आरती प्रशिक्षिका, आनंदी चहारे, योग नृत्य, नितेश मल्लेवार, सलून, बलाई शिल, सुवर्णकार, सुधिर नांदलवार, चित्रकार सुदर्शन बारापत्रे, अटर्नी, कैलास मनवर, नृत्यू, सुधाकर घोरे, परिचारीका, पूष्पा बुधवारे, जरिवर्क प्रशिक्षिका रुबीना शेख, बाॅडी बिल्डर प्रशिक्षक, आशिष बिरीया, बांबु काम, मिनाक्षी वालके, चायनीज प्रशिक्षक, राॅबीन डे, चर्मकार, राजेश चांदेकर, आखाडा प्रशिक्षक, प्रसाद वडकेलवार, भजन प्रशिक्षक, अमोल कोटनाके, फोटो ग्राफर, रवि पाठणकर, पुजारी, लक्ष्मणराव टवलारकर, आॅर्केस्ट्रा मुकसूद खान, हरिसभा प्रदान सुनिता बालदास, ट्रक चालक, लवलेश मिश्रा आदिं गुरुंना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशिद हुसेन, विश्वजित शहा, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमूख भाग्येश्री हांडे, नंदा पंधरे, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, रुपा परसराम, सविता दंडारे, वैशाली रामटेके, कौसर खान, प्रेमीला बावणे, माधूरी निवलकर, अल्का मेश्राम, विमल काटकर, वैशाली मद्दीवार, सोनाली आंबेकर, कल्पना शिंदे, शमा काझी, अनिता झाडे, अस्मिता डोनारकर, निलीमा वनकर, शुभांगी डोंगरवार, आशा देशमूख, आंनद रणशूर, चंद्रशेखर देशमूख, यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात इतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडत जिवणात गुरुचे महत्व पटवून दिले. सुरोज चांदेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.