चंद्रपुर : बल्लारपुर तालुक्यातील कोठारी येथील मारुती सायंस ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणी उच्च माध्यमिक मंडळाने शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या बारावीच्या सत्र २०२०-२१ च्या निकालात १००% निकाल देवून यशाची पुनरावृत्ती केलेली आहे.
या कॉलेज मधील कला व विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. ७५% हून अधिक गुण प्राप्त केलेली २८ विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत दहा विद्यार्थी डीस्टींगशन घेवुन प्राविण्य प्राप्त आहेत.
विज्ञान शाखेत यश मनिष कडेल (९९.३३%), आदित्य बोधलवार (९५.५०%), आलिशा अली (९९.६६%), मीराज खान (९०.१६%) गुण घेवुन प्राविण्य प्राप्त केले आहे तर कला शाखेत रविंद्र योगेश्वर डुंबेरे (७२.३३%) गुण घेवुन प्रथम आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष आशुतोष वा. चटप व सचिव किशोर देवाळकर, प्राचार्य डॉ. जी.एस. कडेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.