नागरिकांच्या समस्येला घेवुन काँग्रेसचा वेकोलीवर धडक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : मागील एक महिन्यांपासून घुग्घुस काँग्रेस कमेटी तर्फे राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली “मेरा शहर मेरा अभियान’ ही स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र नागरिकांच्या समस्या ह्या कायमस्वरूपी वेकोलीने निकाली काढण्या करिता आज दिनांक 03 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, इंटक नेते लक्ष्मणजी सादलावार यांच्या नेतृत्वाखाली सब एरिया कार्यालयावर शेकडो महिलासह धडक देण्यात आली.

वेकोली स्थलांतरीत वस्ती शिवनगर मध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे वेकोलीच्या गांधीनगर, सुभाषनगर,वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून इमारती जीर्ण झाल्या आहे यापासून कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र कचरा जमा झाला असून यातुन अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची वास येत आहे.

या घाणीमध्ये मोठया प्रमाणात डास निर्माण झाले असून यापासून डेंगू मलेरिया व अन्य प्रकारचे जीवघेणें आजार होत आहे. नाल्या तुडुंब भरल्या असून यामध्ये असलेल्या पिण्याचे पाण्याचे पाइपलाइन ही जागोजागी फुटल्या असून त्यामधून दूषित पाणी नळाला येत आहे.
या सर्व समस्यां कायमस्वरूपी निकाली काढण्या करीता सब एरिया कार्यालयात बैठक झाली यामध्ये वेकोलीतर्फे सब एरिया मनेजर एस.पी. विमलावार, सिविल इंजिनिअर,कपूर सर,पाटील सर, बिन्नी सर यांच्याशी चर्चा करून पिण्याचे पाणी व कचराकुंडी व इमारत दुरुस्तीचे काम शिवनगर रस्ता इत्यादी समस्या सकारात्मक सोडवण्यात आले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,वेकोलीचे अजय पाटीलनुरुल सिद्दिकी,इर्शाद कुरेशी,रोशन दंतलवार, विशाल मादर, रोहित डाकूर, शुभम घोडके,सुनील पाटील,सौ. पूजा कांबळे, विजया मूर्ती पेरकुरला,प्रेरणा लिंगमपल्ली, शारदा आकाश पेरकुरला,रिना रवी पेरकुरला,व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.