चंद्रपुरात देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी चंद्रपुर शहरातील देशी – विदेशी कट्टे बाळगणाऱ्यांची गोपनिय माहिती घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शबाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना कारवाई करण्यात आली.

02 सप्टेंबर 2021 चे रात्रौदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की, लखमापुर छत्तीसगढी मोहल्ला चंद्रपुर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परासाराम साहु याने त्याचे घरी देशी बनावटीचे अग्नीशस्र घेऊन लपवुन ठेवले आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी तात्काळ ठिकाणी रवाना झाले. मिळालेल्या माहीतीनुसार रुकधन किराणा दुकान येथे पोहचुन त्याचे दुकानाचा मालक रुकधन परसराम साहु, वय 52 वर्षे रा . लखमापुर वार्ड क्र . 3 छत्तीसगढी झोपडपट्टी, चंद्रपुर याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरझडतीमध्ये एक देशी बनावटीचे लॉन्ग बँरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याचे अंदाजित मुल्य 10,000 / रुपये आहे.

मिळालेले देशी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21 कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोबडे, पो.उप.नि. संदीप कापडे, पो.हवा . संजय आतकुलवार, पो.शि. गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी यांनी केली आहे.