ताडोबात काळ्या बिबट्याचे वास्तव्य; पर्यटकांना आकर्षण

0
392

• पांढरपौणी, ताडोबा तलाव आणि जामनी त्याचे कार्यक्षेत्र
• ताडोबाच्या काळे बिबटला बघण्याची नेटक-याची हौशी इच्छा

चंद्रपूर : पट्टेदार वाघांच्या वास्तव्यामुळे चंद्रपूर जिल्‌ह्यातील ताडोबा अभारण्य देशविदेशात नावारूपास आले आहे. येथील पट्टेदारवाघांचा मुक्त संचार पर्यटकांना हमखास दिसत असल्याने या ठिकाणी सेलिब्रिंटीही आकर्षीत होत आहे. परंतु आता पट्टेदार वाघांसोबतच दुर्मिळ काळ्या बिबटचे वास्तव आढळन आले असून पर्यटकांनाही दर्शन होत आहे.

नुकतेच ताडोबात काळ्या बिबट्याचे दर्शन वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे तसेच ताडोबातील गाईड संजय मानकर यांनाही आठवडाभरापूर्वीच झाले आहे. त्यांनही त्याचे छायाचित्रे टिपले आहे. गावंडे यांना काळा बिबट दुस-यांना त्यांना दिसला आहे. मागील वर्षीही त्यांना याच बिबट दर्शन झाले होते.

देशविदेशात ताडोबा अभियारण्याचे पट्टेदार वाघांच्या वास्तव्य आणि प्रजननासाठी खाती आहे. त्यामुळे या ठिकाणी वाघांचे वास्तव वाढले आहे. पर्यटकांना या ठिकाणी हमखास वाघांचे वास्तव्य होत असते. त्यामुळेच ताडोबा अभयारण्य पट्टेदार वाघांचा आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. आता चार आठ दिवसांच्या अंतराने पर्यटकांना काळ्या बिबट्याचे दर्शन होवू लागले आहे. नुकतेच एका वन्यजीव छायाचित्रकार गावंडे त्याचे दर्शन झाले तर ताडोबाचे गाईड संतय मानकर यांनाही ताडोबा तलाव परिसरात त्याचे आठवडाभरापूर्वी दर्शन घेता आले. पर्यटकांनाही बिबट अधूनमधून दिसत आहे. पट्टेदार वाघांच संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटकांना त्यांचे हमखास दर्शन होते. परंतु ताडोबात काळा बिबट एकच असल्याने त्याचे दर्शन दुर्मिळ स्वरूपाचे आहे. परंतु पट्टेदार वाघांसोबतच पर्यटकांकरिता तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा बिबट अडीच ते तीन वर्षाचा आहे. सध्या त्याचे क्षेत्र पांढरपौणी, जामनी, ताडोबा तलाव या परिसरात जास्त दिसून येत आहे. ब्लॅक लेपर्ड हे अतिशय दुर्मिळ आहेत. त्याताही काळ्या रंगाचे स्पॉट असलेले बिबटे पहायला मिळणं हे त्यातही दुर्मिळ आहे. असे melanistic लेपर्ड हे एकूण बिबट्यांमध्ये 11% आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पिगमेंटेशन मुळे त्याच्या त्वचेचा रंग, पोअर आणि कोट्स हे काळे होतात, वन्यजिव प्रेमिंचे म्हणने आहे. असे दुर्मिळ प्राणी अनेकदा या बिबट्याबद्दल नागरिकांना सोडा अनेक पर्यटकांना माहिती नाही.

कोणी काळ्या रंगाचा बिबट असू शकतो यावर विश्वासही करणार नाही. सर्वजण त्याचा शोध फक्त इंटरनेटवर घेत असतात. जगभरात किती काळ्या रंगाचे बिबटे आहेत याची अधिकृत माहितीसुद्धा आढळून येत नाही. त्यामुळे काळा बिबटचे दर्शन होणे म्हणजे भाग्यच समजतात. दिसल्यास शिका-यांची शिकार बनून जातात. त्यामुळे काळा बिबटचे दर्शन होणे म्हणजे भाग्यच समजतात
नुकतेच ताडोबामध्ये दुर्मिळ काळा बिबट्या दिसल्याचे दर्शन वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांना झाल्याने त्यांनीही त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. सोशल मिडीयावरील छायाचित्रांना नेटक-यांनी चांगली पसंती दिली असून ताडोबाच्या काळ्या बिबट बाबत आकर्षण दिसून येत आहे. अनेक पर्यटकांना या बिबटला पहाण्याची इच्छा त्यांच्या अभिप्रायावरून दिसून येत आहे.