पालकमंत्री वड्डेटीवार यांचे घुग्घुस नगरपरिषदेत प्रथम आगमन 

0
456
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : नगरपरिषदचे शिल्पकार राज्याचे बहुजन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार उद्या दिनांक 05 फरवरी रोजी दुपारी 03 वाजता एसीसी सिमेंट कंपनीतील कामगार समस्या तसेच प्रदूषणाच्या तक्रारीची दखल घेऊन समस्या सोडवण्यासाठी येत आहे.

घुग्घुस येथील नेते तसेच कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी
पालकमंत्री यांना कंत्राटी कामगार यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या तक्रारी व प्रदूषण संदर्भात तक्रारी केल्या होत्या त्याची दखल घेवून पालकमंत्री हे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

घुग्घुस काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर हे पालकमंत्री यांच्या स्वागताची तैयारी करीत आहे.