अवैध देशी दारूसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0
345

घुग्घुस : गुरुवारला मध्यरात्री 1 वाजता दरम्यान अज्ञात आरोपी बलेनो क्र. एमएच 31 सीआर 3368 मध्ये 10 पेटी अवैध देशी दारू वणी कडून चंद्रपूर कडे घुग्घूस मार्गे नेत असल्याची गुप्त माहिती मिळताच घुग्घूस पोलिसानी व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसानी घुग्घूस वणी मार्गावरील राजीव रतन चौकात सपाळा रचला.
वाहन जवळ येताच पोलिसानी वाहन चालकास वाहन थांबविण्यासाठी हात दाखविला परंतु वाहन चालकाने वाहन न थांबाविता समोर निघून गेला. वाहन चालक पळून जाताच पोलिसानी पाठलाग करणे सुरु केले असता अज्ञात आरोपी वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

पोलिसानी वाहन व 10 पेटी अवैध देशी ताब्यात घेऊन अज्ञात फरार चालका विरुद्ध घुग्घूस पोलीस स्टेशन येथे कलम 65 (अ ) मदाका गुन्हा नोंद केला असून फरार अज्ञात आरोपीचा शोध घुग्घूस पोलीस करीत आहे.

ही कारवाही पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, गुन्हे पथकाचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, महेंद्र वन्नकवार, मनोज धकाते, रंजित भुरसे, प्रकाश करमे, सचिन डोहे व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसानी केली.