पोटच्या पोराने बापाला बांबूच्या काठीने बेदम मारून केली हत्या

0
1158
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बहिणीच्या वर पाहणे कार्यक्रमात बोलावले नाही मुलगा संतापला

चंद्रपूर : बहिणीला वराकडून पहाणी करण्यासाठी आलेल्या छोटे खाणी कार्यक्रमात आपल्याला बोलविले नाही म्हणून संतापलेल्या मुलाने आपल्याच वडीलाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना चिमूर तालुक्यात चक लोहारा येथे काल दूपारी (४ मार्च) ला दुपारी अडीच वाजताचे सुमारास घडली. सिद्धार्थ रामदास सवाईकर (४९) असे मृत वडिलाचे नाव आहे तर सुखदेव सिद्धार्थ सवाईकर असे आरोपी मुलाचे नाव आहे.

वडिल सिद्धार्थ रामदास सवाईकर हे परिवारापासून वेगळे राहात होते. त्यांना मुलगी असल्याने त्यांनी यावर्षी लग्न आटोपण्याचे ठरविले होते. त्यामुळे ते वर मुलांना मुलगी दाखवत होते. काल बुधवारी दुपारच्या सुमारास मुलीला पाहण्यासाठी बाहेर गावावरून वर मुलगा आणि त्यांचेकडील मंडळी आले होते. या कार्यक्रमाला म्हाता-या वडिलाचा मुलगा सिध्दार्थ हा विभक्त राहत असल्याने आणि वडिलांसोबत पटत नसल्याने त्याला बोलविण्यात आले नाही. बहिणीला पाहण्यासाठी वर मुलगा आला असल्याची माहिती मुलाला होताच त्याने वडिलाचे घर गाठले. आणि पाहुण्यांसमोरच वर मुलाला शिवीगाळ करणे सुरु केले.

त्यामुळे वडील आणी मुलामध्ये भांडण सुरू झाले. भांडण वाढून त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. आरोपी मुलाने रागाच्या भरात वडिलांना बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिल सिद्धार्थ सवाईकर यांला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. वाटेतच वडिलाचा मृत्यू झाला. फिर्यादी ताराचंद रामदास सवाईकर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.
आरोपी मुलगा सुखदेव सिद्धार्थ सवाईकर (२०) भा. दं. वि. च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुखदेव सवाईकर ला अटक करण्यात आली आहे. चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे तपास करीत आहेत.