यवतमाळमध्ये लागू होणार कडक संचारबंदी?

0
675
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ शहरामध्ये दररोज ३००० नागरिकांच्या तपासण्या करण्यात येत आहे. यातील संशयित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, हे नागरिक कुठल्याही जबाबदारीचे भान न ठेवता इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

यवतमाळ : शहरामध्ये मागील दहा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २२ फेब्रुवारीपासून तर ३ मार्च या कालावधीत २२५९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. तर याच दहा दिवसात २२ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच ४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून यवतमाळ शहरात आठवडाभरासाठी संपूर्ण कडक संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

चाचण्यांसाठी नागरिकांनी समोर यावे

यवतमाळ शहरामध्ये दररोज ३००० नागरिकांच्या तपासण्या करण्यात येत आहे. यातील संशयित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, हे नागरिक कुठल्याही जबाबदारीचे भान न ठेवता इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आणि म्हणूनच ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यांनी स्वतः तपासणीसाठी पुढे यावे अन्यथा याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर होईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

शहरात शंभरावर प्रतिबंधित क्षेत्र

यवतमाळ शहरातील ज्या भागात दररोज २५० रुग्ण आढळत आहेत त्या भागाला भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरात असे शंभरावर प्रतिबंधित क्षेत्र झाल्याने संपूर्ण यवतमाळ शहरात कडक संचारबंदी करण्याच्या निर्णयावर प्रशासन पोहोचले आहे.