बचत गटाच्या दुकानचालकाकडून विभागाच्या बदनामीचा घाट

0
92
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रास्त दुकानदारांनी घेतली तहसिलदारांची भेट
• ७ एप्रिलला विशेष बैठक

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटकाळात प्रशासनाकडून नागरिकांना मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.या अन्नधान्याचे देयके बचत गटाच्या अध्यक्ष सचिवांच्या खात्यात शासनाकडून जमा करण्यात आले.दरम्यान बचत गटाचे पदाधिकारी व त्यांनी ठेवलेल्या दुकानचालकात झालेल्या आर्थीक वादातून काही दुकानचालकांनी प्रशासनाच्या पुरवठा विभागाच्या बदनामीचा घाट रचीत अधिकारी 10 टक्के रक्कम मागित असल्याचा आरोप केली.दरम्यान बचत गट दुकानचालकाच्या या भुमिकेविरोधात रास्त दुकानदार संघटनेनी तहसिलदारांची भेट घेत हा विषय मांडला.आता या प्रकरणी तहसिलदारांनी सात एप्रिल रोजी बैठक बोलविली आहे.

गोंडपिपरी तालुक्यात एकून 86 रास्त दुकान आहेत.यापैकी 20 दुकान हे बचत गटाच्या माध्यमातून चालविण्यात येतात.बचत गटाचे नांव असले तरी प्रत्यक्षात नौकरनाम्याव्दारे त्यांनी नेमणूक केलेला दुकान चालवितो.कोव्हीड च्या संकटकाळात शासनाकडून गोरगरिबांना तिन महिने मोफत अन्नधान्य देण्यात आले.व त्याचे देयके बचत गटाच्या खात्यात जमा करण्यात आले.पण काही बचत गट व दुकान चालकात आर्थीक वाद झाले.याचमुळे दुकानचालकांनी पुरवठा अधिकाÚयांना विनाकारण वाÚयावर धरले.पुरवठा अधिकारी दुकानदारांकडून दहा टक्के रक्कम वसुली करित असल्याचे वृत्तही प्रसिध्द केले.गोंडपिपरीतील पुरवठा विभागाने कोव्हिडच्या संकटकाळात अतिशय उत्तम कामगीरी केली.एकही गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृतीही केली.व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखिल केली.पण असे असतांना विभागाची बदनामी करण्याचा घाट घातल्याने तालुक्यातील रास्त दुकानदार संघटनेने प्रचंड संताप व्यक्त केला.संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदार के.डी.मेश्राम यांची भेट घेतली.त्यांच्यापुढे सारा प्रकार कथन केला.याप्रकरणी आता तहसिलदारांनी सात एप्रिल रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.तालुका रास्त दुकानदार संघटनेने बचत गटामार्फत चालविण्यात येणाÚया दुकानात अध्यक्ष व सचिव यांचे नाॅमीनी ई पास मशीनला नोंद करण्याची मागणी तहसिलदारांकडे केली आहे.

नौकरनाम्यावर तिन तिन दुकान
गोंडपिपरी तालुक्यात 86 रास्त दुकानापैकी 20 दुकान बचत गटाकडे आहेत.पण नौकरनाम्याचा आधार घेत एक माणूस तिन तिन दुकान चालवित असल्याच प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी तालुका प्रशासनाने लक्ष दयावे व त्याच्याकडील अतिरीक्त दुकान तातडीने काढण्यात यावे अशी मागणी समोर येेत आहे.

गोंडपिपरी तालुका प्रशासनातील पुरवठा विभागाने कोरोना काळात अतिउत्तम कामगीरी केली आहे.पण काहींनी पुरवठा विभागाची हेतूपूरस्पर बदनामी करण्याचा घाट घातला आहे.असा कुठलाही प्रकार नसून आपणाकडे याबाबत लेखी अथवा तोंडी तक्रार आलेली नाही.
महेद्र कुनघाटकर सदस्य दक्षता समिती तथा सामाजिक कार्यकर्ते,आक्सापूर