अखेर… वेकोलि क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया विरूद्ध गुन्ह्य दाखल

0
252

• आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कलम दाखल
प्रकल्पग्रस्त- आशा घटे आत्महत्या प्रकरणात कारवाई

चंद्रपूर : सास्ती येथिल 19 वर्षीय प्रकल्पग्रस्त युवती आशा घटे आत्महत्या प्रकरणात राजुरा पोलिसांनी अखेर कारवाई करत वेकोलि क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 31 मार्च 2021 रोजी घडलेल्या ह्या प्रकरणात संपुर्ण चौकशी करून पोलिसांनी 3 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास कारवाई केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सास्ती येथील आशा तुळशिराम घटे यांच्या वडीलाची शेती वे.को.ली. मार्फत संपादीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आशा घटे ही वेकोली मार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी पुलया यांनी, धोपटाळा येथील वेकोली कार्यालयात दि. २२ मार्च २०२१ रोजी नौकरीसाठीचे सर्व दस्ताऐवज घेवून कुटूंबीयासोबत बोलविले होते.

यावेळी तिचे वडील व आजोबा यांनी संमतीपत्राद्वारे आपल्या मुलीला नौकरी देण्याचे करारनामा दिला होता. परंतु या नियोजन अधिकाऱ्यांनी आशा हिला तिच्या संपूर्ण परिवारा समोर अपमानित करत अपशब्द वापरले त्रास दिला असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
आपला कुटुंबीयांना समोर झालेला अपमान करून नोकरी देण्यास वारंवार वेकोली अधिकारी त्रास देत असल्याने तिने घरी येऊन विष प्राशन केले. आशा ची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी सास्ती येथील खाजगी रूग्णालयात औषधोपचार केले. आणखी प्रकृती बिघडत गेल्याने दिनांक २७ मार्च ला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे ३१ मार्च ला चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

अशा घट्ट मूर्त प्रकरणात ्षेत्रीय नियोजन अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली होती. सर्वप्रथम पोलिसांनी गुन्हा तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया विरूद्ध गुन्ह्य दाखल केला आहे.