सर्वायकल कॅन्सर मुक्त भारत बनवुया : डॉ. प्रिया गणेशकुमार, अध्यक्षा, स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमीटी, मुंबई

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

● भद्रावतीत भव्य नि:शुल्क स्त्री कर्करोग पुर्वनिदान, औषधोपचार व जनजागृती शिबिर

● फॉग्सी स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमीटी, स्त्रीरोग संघटना, चंद्रपुर व ग्रामीण रुग्णालय, भद्रावती यांचे यशस्वी आयोजन

● स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे योगदान

चंद्रपूर : स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व फॉग्सी स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमीटी, स्त्रीरोग संघटना, चंद्रपुर व ग्रामीण रुग्णालय, भद्रावती यांचे संयुक्त विदयमाने भव्य नि:शुल्क स्त्री कर्करोग पुर्वनिदान, औषधोपचार व जनजागृती शिबिर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आज (दि. ४) ला सकाळी ११ ते २ या वेळेत घेण्यात आले. दुपारी २ पासून स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग समज-गैरसमज या विषयावार स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमीटी, मुंबईच्या अध्यक्षा डॉ. प्रिया गणेशकुमार यांनी मार्गदर्शन केले.
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी बोलतांना डॉ. प्रिया गणेशकुमार म्हणाल्या की, सर्वायकल कॅन्सर मुक्त भारत अभियान राबवून, सर्वायकल कॅन्सर मुक्त भारत बनवुया. यासाठी महिलांनी जाग्रुत असणे आवश्यक आहे. शरीराकडे लक्ष देवून लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्यावी. आहार, व्यायाम व शरीरातील बदलांकडे लक्ष दयावे. सतर्कतेने वेळीच तपासणी व उपचार घेवुन सर्वायकल कॅन्सर रोखू शकतो.

यावेळी पस्तीस वर्षांवरील लक्षणे असलेल्या महिलांची अत्याधुनिक मशीनद्वारे कॉल्पोस्कोपी तपासणीद्वारे गर्भाशयमुखाची मोफत तपासणी करण्यात आली. जवळपास ७० महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.
सोबतच ९ ते २८ वयोगटातील काही निवडक मुलींना घातक एचपीव्ही विषाणु पासून म्हणजेच कर्करोगापासून वाचविण्यासाठी शिबिरात लस देण्यात आली.
या शिबिरात स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमीटी (फॉग्सी), मुंबईच्या अध्यक्षा डॉ. प्रिया गणेशकुमार, चंद्रपुर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कविता गांधी, सचिव डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्षा डॉ. मनिषा घाटे, सहसचिव डॉ. वृषाली बोंदगुलवार, सहसचिव डॉ. वंदना रेगुंडवार, कोषाध्यक्षा डॉ. समृध्दी आईंचवार, सदस्य डॉ.नगिना नायडू, आदींनी या शिबिरात सहभाग दर्शविला व मार्गदर्शन केले.यावेळी निलिमा शिंदे, सुषमा शिंदे, ईनरव्हील क्लबच्या डॉ. माला प्रेमचंद, सुनंदा खंडाळकर, प्रेमा पोटदुखे आदी उपस्थित होत्या.

चंद्रपूर जिल्ह्यात विशेषता भद्रावती तालुक्यात स्तन व गर्भाशय कर्करोगाचे रूग्ण वाढत आहेत. म्हणुन आधीच महिलांमधे जागृती होणे आवश्यक आहे. ९ ते २८ वयोगटातील युवतींनी त्यांचे सेक्शुअल लाईफ सुरु होण्याअगोदर लस घेतल्यास फायदा होवू शकतो : डॉ. प्रिया शिंदे

शहरात आयोजित झालेल्या या नि:शुल्क स्त्री कर्करोग पुर्वनिदान, औषधोपचार व जनजागृती शिबिराचा लाभ भद्रावती तालुक्यातील युवती व महिलांना घेता आला याचे समाधान आहे. याप्रकारचे कार्यक्रम घेत राहू, असे प्रतिपादन स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रवि शिंदे यांनी केले.