चारित्र्यावर शिंतोडे उडविणे हेच त्या तथाकथित लोकांचं काम

लसीकरण केंद्रावरील डाटा ऑपरेटिंग हे गुन्हा आहे काय?

घुग्घुस : शहरात सध्या तथाकथित खोट्या बातम्या    छापून बदनामी ह्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. सतत कोणत्याही कार्यक्रमातील त्रुटी काढायची हाच एक कलमी कार्यक्रम सध्या घुग्घुस शहरात शुरू असून ह्या प्रकाराने गावातील वातावरण हळूहळू पेट घेत आहे.
कार्यकर्त्याची नाराजी कधी उग्र होईल याला नेम उरतो की नाही अशी परिस्थिती आहे.

गेल्या आठवड्यातच आताच एक्सप्रेसच्या पत्रकाराने ” खावटी वाटप” केंद्रावरून अध्यक्षाचा पलायन अशी खोटी बातमी लावली व त्यांचे कॉल रेकॉर्ड वरून ते उघडे ही पडले ही वार्ता मागे पडत नाही तोच बेधडक 24 तास हया युट्युब पोर्टेल च्या माध्यमातून लसीकरण केंद्रावर डाटा ऑपरेटर म्हणून शहर अध्यक्षांचा नातेवाईक असून हा धक्कादायक प्रकार म्हणून बातमी प्रसारित केली .

काँग्रेस अध्यक्षाच्या पुतण्या डाटा ऑपरेटिंगचे काम करू शकत नाही काय ?

लसीकरणा सारख्या जीवनावश्यक कार्यात निःशुल्क आठ तास सेवा देणे गुन्हा आहे काय ?

काँग्रेस अध्यक्षाचा पुतण्या विजय रेड्डी हे मागील एका महिन्यापासून वॉर्ड क्रं सहा येथील शासकीय सभागृहात डाटा ऑपरेटर म्हणून आपली निःशुल्क सेवा देत आहे.
मात्र याची देखील या तथाकथित लोकांना त्रास होत आहे. हा धक्कादायक प्रकार असल्याची वार्ता बेधडक न्यूज नावाच्या पोर्टेल मध्ये लावून त्या युवकांला मानसिक त्रास पोहचवून शेवटी साध्य काय होणार ?