लोकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे उघडा; माता महाकाली मंदिरसमोर मनसेचे घंटानाद आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सत्ताधाऱ्यांचे मेळावे राजकीय पक्षांचे मोर्चे आंदोलने राज्यभर सुरू आहेत, परंतु अध्यात्मिक ठिकाणे ज्यामुळे सामान्य नागरिकांना आत्मविश्वास येतो अशे प्रार्थनास्थळे मंदिरे उघडण्यासंबंधी सरकार निरुत्साही असून, सामान्य नागरिकांच्या भावना समजून न घेता सरकार आपल्याच सत्तेत आणि राजकारणात मदमस्त झाली आहे, करीता या दुतोंडी सरकार ला जाग यावा व सामान्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठी आज चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर समोर राज्य सरकार विरोधात घटनांद आंदोलन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली, यावेळी प्रवेशद्वाराजवळ पूजा करून सरकारला सद्धूबुद्धि दे अश्या घोषणा करीत सरकारला जाग येऊ दे अशे आव्हान करत नारळ फोडून माता महाकाली कडे मनसेने साकडे घातले.

महाराष्ट्रात संस्कृतीत महत्वाचा वाटा असणाऱ्या मंदिरांना बंद ठेऊन संस्कृतीविरोधी मदिरालाय मात्र सरकारने उघडले अश्या या दुतोंडी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही असा आरोप यावेळी मनसेने केला.

सदर आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आले, यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हासचिव किशोर मडगूलवार, महिला सेना जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, तालुकाध्यक्ष प्रकाश नगरकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनवीसे तालुकाध्यक्ष विवेक धोटे, पडोली ग्रामपंचायत सदस्य, निशिकांत पिसे, ग्राम. पं. सदस्य नितीन टेकाम,शहर संघटक मनोज तांबेकर,शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, मनसे शहर सचिव पिंटू धिरडे, करण नायर, शैलेश सादलावर, मनवीसे शहरउपाध्यक्ष पियुष धुपे, अर्चना आमटे, वाणी सादलावर, कृष्णा गुप्ता, बाळू शेवते, राज वर्मा, वर्षा भोमले, चैतन्य सदाफळ, ऋषिकेश बालमवार, गणेश देशमुख, सिद्धार्थ सुरपाम, तन्मय पेटकर, अमोल चौधरी, प्रतीक गोहोकार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.