खड्यातील पाण्यात बुडुन दोन वर्षीय बालकाचा मृत्यू!

वणी : शहरातील गोकुल नगर च्या मागील बाजूस असलेल्या खड्यातील पाण्यामध्ये बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

सिद्धार्थ सुनील पोटे असे या दोन वर्षीय मृतक बालकाचे नाव आहे. सुनील पोटे हे आपल्या परिवारासह गोकुल नगर येथे वास्तव करून मोल मजुरी करून ते आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करतात. आज ता. 4 सप्टेंबर सुनील कामासाठी बाहेर गेले होते तर पत्नी सविता ही घरातील काम करीत होत्या.

पोटे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जागेवर माती खांदून नेल्याने त्या ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्डामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सिद्धार्थ हा खेळता खेळता त्या खड्यात पडला.आई वडील घरी आल्यावर सिद्धार्थ दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा पत्ता लागत नसल्याने तो खड्यातील पाण्यात तर पडला नसावा असा अंदाज लावून नागरिकांच्या मदतीने खड्यातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.