अरेच्चा | नकोडा ग्रामपंचायतीत नवरा – बायको उतरले जोडीने

0
442

माजी समाजकल्याण सभापती यांच्या पत्नीसह अनेक मात्तम्बर रिंगणात

घुग्घूस : ग्रामपंचायतच्या निवडणूकित नातेसंबंधी ऐका- मेकां विरोधात उभे ठाकतात हा आजवरचा इतिहास आहे. घुग्घुस शहरा लगत असलेले जिल्ह्यातील प्रसिद्ध नकोडा ग्रामपंचायतीत एकूण सहा हजार लोकसंख्या असून पांच वॉर्ड असून तेरा सदस्य आहे.

यावेळेस माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या पत्नी सह माजी सरपंच सौ.तनुश्री बांदूरकर, उपसरपंच हनिफ शेख,यांच्या सह माजी ग्रामपंचायतचे आजी – माजी सदस्य ही रणांगणात उतरले आहे आणि विशेष बाब म्हणजे छोट्याश्या ग्रामपंचायतीत नवरा – बायकोच्या तीन जोड्या मैदानात असल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आलेले आहे