चंद्रपुरात सेनेचे केंद्र सरकार विरोधात तर भाजपचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

0
238
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• शिवसेनेने काढली पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात बैलबंडी व दुचाकी रॅली
• भाजपने प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून केला महा आघाडी सरकारचा निषेध

चंद्रपूर : पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या निरंतरपणे होत असलेल्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने बैलबंडी व दुचाकी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले तर घुगुस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोणा काळात राज्यातील ग्राहकांना भरमसाठ पाठवण्यात आलेले वीज बिल माफ करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा विकास आघाडी सरकारची प्रति प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात तर भाजपाने राज्य सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामुळे अशोकराव दिवस चांगलेच गाजले.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला विरोध करत आज शुक्रवारी ५ फेब्रुवारी २०२१ ला शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार च्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. जटपुरा गेट येथून बैलबंडी व दुचाकी रॅली काढून आंदोलक इंधन दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडर विरोध करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी, यावेळी केंद्र सरकारने देशवासीयांची फसवणूक केली, मोदी सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल, डीझल व गॅस सिलेंडरचे भाव कमी करू असे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्णतः खोटे ठरले असा आरोप त्यांनी केला.

कोरोना काळात राज्यातील ग्राहकांना वाढीव विजबील पाठवून आणि विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश देणा-या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने घुग्घूस येथे गांधी चौकात आज शुक्रवारी ५ फेब्रुवारी २१ ला करण्यात आले.

कोरोनाकाळातील वाढीव वीजबिल माफ करावे याकरिता भारतीय जनता पार्टी चंद्रपूर कडून चारदा आंदोलन करण्यात आली. परंतू अजूनही सामान्य जनतेचा आवाज राज्यसरकारच्या कानात जात नाही याचा अर्थ राज्यसरकार बधिर झाली आहे, “जनतेचे मरण,हेच राज्यसरकारचे धोरण” आहे असा आरोप करीत जो पर्यंत वाढीव वीजबिल माफ करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला . महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा गांधी चौकातून काढण्यात आली. ही यात्रा घुग्घूस वस्ती, अमराई, विठ्ठल मंदिर, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत बस स्थानक चौकात धडकताच तिथे प्रतिकात्मक प्रेतयात्रेचे दहन केले. विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कार्यालयास टाळा ठोकून आंदोलन करण्यात आले.

कोणताही कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी ग्राहकांच्या घरी पोहचला तर भाजपाचा कार्यकर्ता वीज खंडित होऊ देणार नाही. त्याला परतावून लावेल असा इशारा यावेळी दिला. आंदोलनाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.