अखेर गोंडपिपरीचे लाचखोर दोन पोलीस शिपाई निलंबीत

0
1182
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दोन्ही पोलिस घटनेच्या दिवसापासून आहेत फरार
• अटकेतील होमगार्डला जामीन मंजूर

चंद्रपूर : गोंडपिपरी येथील ट्रक चालकाकडून दहा हजार रूपयाची लाच घेणाऱ्या दोन पोलीस शिपायावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाचा ठाणेदाराला धक्का देऊन लाचखोर दोन्ही पोलीस शिपाई अजूनही फरार आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने दोन्ही पोलिसांवर कारवाई केली आहे.

गोंडपिपरी येथील मुख्य मार्गावरील गांधी चैकात २ फेब्रुवारी ला गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारतांना गोंडपिपरी येथील राणा नामक होमगार्डला रंगेहाथ अटक केली. तर गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत देवेश कटरे व संतोष काकडे हे दोन पोलीस लाचखोरीच्या घटनेतील मुख्य सुत्रधार होते. कारवाई दरम्यान देवेश कटरे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले. पण कटरेने एसीबीचे ठाणेदार यशवंत राउत यांना धक्का देत पळ काढला होता. तेव्हापासून कटरे व काकडे हे फरार होते. दरम्यान या प्रकरणी या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल गुरूवारी रात्री या प्रकरणी देवेश कटरे व संतोष काकडे या दोन्ही पोलीसांना निलंबीत करण्याचे आदेश गोंडपिपरी पोलिस ठाण्याला मिळाले. या बाबतची माहिती गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांनीही दिली आहे. दरम्यान दोन्ही पोलिस शिपाई अजूनही फरारच आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या होमगार्ड जामीन मंजूर करण्यात आला आहे तर संतोष काकडे व देवेश कटरे अजूनही फरार आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने दोन्ही शिपायांना निलंबित केले आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख वैशाली डाले यांनी दिली आहे.