तलावावर बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या  शेतकऱ्यांवर वाघाच्या हल्ला, शेतकरी ठार

0
368
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• चिंतलधाबा बिटातील चेक आष्टा येथील घटना

चंद्रपूर : गाव तलावावर बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्यांवर वाघाने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथे आज शुक्रवारी (५ मार्च २०२१) ला सकाळी उघडकीस आली आहे. पुरुषोत्तम मडावी (५२ वर्ष ) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

चेक आष्टा येथील शेतकरी पुरुषोत्तम मडावी काल गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चेक आष्टा गावालगतच्या तलावावर बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले होते. सोबत आणखी ३ व्यक्ती होते. काही व्यक्ती घरी परतले तर पुरूषोत्तम मडावी मात्र घरी परतले नाही. ते अचानक गायब झाले. सदर शेतकरी रात्री पर्यंत घरी न आल्याने गावातील काही नागरिकांनी काल गुरूवारी रात्री ला आठवाजताच्या सुमारास जंगलात शोधाशोध केली असता. मात्र तो सापडला नाही. परत आज शुक्रवारी ५ मार्च ला सकाळी पुन्हा काहीनागरिक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. ९६ राखीव जंगलात वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम मडावी यांचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेवरून त्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी गाेंडपिपरी ला पाठविण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, एसीएफ कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर जी मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते.
मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातू व बराच मोठा परीवार आहे. मृतकाच्या परीवाराला २० लाखांची मदत व नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.