
घुग्घुस : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवासाठी आजचा दिवस अत्यन्त महत्वाचा आहे. बाळशास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे 6 जानेवारी रोजी पत्रकार दिवस घोषीत केला आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केले होते.
पत्रकार बांधव उन्ह पाऊस वारा झेलत बारा महिने समाजातील दिन दुबळ्या शोषित वंचिताचा आवाज बुलंद करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात म्हणून आजच्या दिवशी त्यांचे सन्मान करने हे महत्त्वाचे आहे.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज घुग्घुस शहर काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने पत्रकार बांधवाचे “कलम” व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळेस ज्येष्ठ पत्रकार शामराव बोबडे, गजानन साखरकर श्रीकांत माहुलकर, मनोज कनकम, सुरेश खडसे, प्रशांत चरडे, नौशाद शेख, प्रणय बंडी, विक्की गुप्ता, सदन रेंनकुंटला,हनिफ शेख, देवानंद ठाकरे यांचा कॉंग्रेस पदाधिकारी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस नेते रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) सैय्यद अनवर कामगार नेते, व मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.