सिद्धार्थ कासवटे यांची बिनविरोध निवड; चुकीच्या वृत्तावर विश्वास ठेवू नये

0
498
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राजुरा (चंद्रपूर) : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून यात एक भाऊ दुसऱ्या भावासमोर निवडणुकीच्या मैदानात उतरला असताना मात्र गोवरी ग्रामपंचायत निवडणुकीत येथील संबुद्ध पंचशील मंडळाने प्रभाग क्रमांक तीन मधील अनुसूचित जाती प्रवागकरिता निवडणूक न लढविता सिद्धार्थ कासवटे यांना बिनविरोध निवडून देऊन इतर समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

गावागावात विविध पक्षाचे, समाजाचे लोक नेतृत्व करीत असतात. कधी वडिलांच्या विरोधात मुलगा तर कधी भावाच्या विरोधात भाऊ निवडणुकीत उभा राहत असल्याने आपआपसात मतभेद होऊन अनाठायी खर्च करीत असते. मात्र संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष दिनेश घागरगुंडे व इतर पदाधिकारी यांनी एकत्र बसून समाजाच्या वतीने कोणत्याही पक्षाला जवळ न करता गोवरी ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच स्वतंत्र सिद्धार्थ कासवटे या उच्च शिक्षित तरुणाला उमेदवारी देऊन अविरोध निवडून दिल्याने सर्वत्र समाजाचे व त्यांचे कौतुक होत आहे. चुकीच्या वृत्तावर कोणीही विश्वास ठेवू नये असे मंडळाचे अध्यक्ष दिनेश घागरगुंडे यांनी सांगितले असून संबुद्ध पंचशील मंडळ हे इतर समाजासाठी आदर्श ठरत आहे.