17 तोळे सोने व 30 तोळे चांदी सह सत्तर हजार केले लंपास
घुग्घुस : येथील साई नगर वॉर्ड राधाकृष्ण मंदिर परिसरात राहणारे पाऊल नारायण जंगम हे वेकोली कर्मी असून ते कामावर गेले व पत्नी काही कामा निमित्त बाहेर गेली त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेला असता अज्ञात चोरट्यांनी घरातील कुलुप तोडून कपाटातील 17 तोळे सोने व 30 तोळे चांदी व सत्तर हजार नगद रक्कम घेऊन पोबारा केला.
पती पत्नी घरात आले असता ही चोरी उघडकीस आली.
आज सकाळीच सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानातील चोरीचा तपास पूर्ण होत नाही तोच दुपारी धाडसी चोरी मळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घुग्घुस शहरात चोरांनी धुमाकूळ ठोकल्याने नागरिकांत भय निर्माण झाले आहे