दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात मुलासह वडीलाचा मृत्यू

0
3103

◾भाटिया कोलवॉशरीज जवळ घडला अपघात

चंद्रपूर : घुग्घूस जवळील भाटिया कोल वाशरी जवळ झालेल्या अपघातात ८ वर्षीय मुलाचा जागीच तर वडिलांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. हा अपघात आज शनिवारी (६फेब्रुवारी २०२१) दुपारी अडीच्या सुमारास घडला. वडील उमेश नारायण दानव (35) आणि मुलगा आयुष उमेश दानव (8) असे मृतांची नावे आहेत. तर सतीश दादाजी दानव हा जखमी आहे. मृत आणि जखमी हे रा. वाघेडा तह. भद्रावती येथील आहेत.

वडील उमेश नारायण दानव हे मुलगा आणि भावासह
दुचाकी क्र. एमएच ३४ बीई ८१९६ ने घुग्घूस मार्गे घरी परत जात होते. दरम्यान तडाळी वरून घुग्घूस कडे येणाऱ्या कार क्र. एमएच ३४ एएम ८५०८ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात आठ वर्षीय आयुषचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी उमेश दानवला नागरिकांनी घूग्घूस येथील राजीव रतन दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ सतीश दानव हा गंभीर आहे.त्याचेवर उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच पो. नि. राहुल गांगुर्डे, यांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.