कोविड योद्यांच्या आंदोलनांवर तोडगा काढण्यासाठी “जिल्हा प्रशासन अलर्ट”

0
35

आठ महिण्यापासून वेतन आहे थकीत

चंद्रपूर : आठ महिण्यापासून थकीत असलेले वेतन आणि समान काम समान वेतनाची अंमलबाजवणी करावी या ककरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले कोविड योद्यांचे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. तातडीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकालात काढण्या याव्यात यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. काल शुक्रवारी या कामगारांन हल्लाबोल आंदोलन करून वैद्यकीय महाविदयालयात तोडफोड केली होती. आक्रमक झालेल्या कामगारांचे हे रौद्ररूप पाहून प्रशासनात हालचाली वाढल्या असल्याची सुत्रांनी माहिती दिली.

शुक्रवारी डेरा आंदोलनातील संतप्त कोविड योद्यांनी वैद्यकीय महाविद्यालयावर हल्लाबोल करून तोडफोड केल्यानंतर आंदोलन चिघळले. 8 महिण्यापासून थकीत असलेल्या पगारामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे कामगार संतापले. मात्र हल्लाबोल आंदोलनातील त्यांचे रौद्ररूप पाहिल्यानंतर पोलीस व जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाला गांभीर्याने घेतले आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यप्रणालीमुळे कामगारांचे वेतन देण्यास विलंब होत असल्याची बाब जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनावर दबाव वाढविण्यात आला आहे. पडद्यामागे आं प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याची सूत्रांकडून मिळते आहे.

विश्व सिंधी सेवा संगम चे डेरा आंदोलनाला समर्थन
काल 5 मार्च रोजी वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दंडा लेकर हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डेरा आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहे. आज या आंदोलनाचा 27 वा दिवस होता. विविध संघटना व व्यक्तींनी आज डेरा आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. विश्व सिंधी सेवा संगमच्या शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाच्या मंडपामध्ये भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले. विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष मोहन आसवानी,पदाधिकारी बोनी आसवानी, सागर दुधानी, विशाल गिडवानी इत्यादींचा या शिष्टमंडळात समावेश होता. ग्रीन प्लॅनेट चे प्रा. सुरेश चोपणे,काँग्रेस ओबीसी सेलचे उमाकांत धांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गेडाम तसेच श्यामसुंदर पेनुरकर यांनी सुद्धा डेरा आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here