पालकमंत्री यांच्या उत्तम आरोग्यासाठी ” महामृत्यूजय यज्ञ’

0
411

” विजय वड्डेटीवार यांना कोरोनाची लागण “

घुग्घुस : राज्याचे बहुजन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदद व पुनर्वसन तसेच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री लोकनेते विजय वड्डेटीवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा झाली पाहिजे.

ते लवकरात लवकर रोगमुक्त झाले पाहिजे याकरिता घुग्घुस काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी श्रीक्षेत्र पांढरकवडा येथील जागृत देवस्थान पंचमुखी हनुमान मंदिर येथे महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले.

विधिवत पूजा अर्चना करून लवकरात लवकर स्वास्थ सुधारणेची प्रार्थना करण्यात आली.
परिसरातील गरजवंताना दान देण्यात आले.

याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, कोंडय्या तराला, रोशन दंतालवार, विशाल मादर, सुधाकर जुनारकर, देवानंद ठाकरे, बालकिशन कुळसंगे,नुरुल सिद्दीकी, हरीश कांबळे,संदीप कांबळे, बबलू मुंढे, सुमीत मांढरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.