कोरोनाच्या विषाणूच्या वैश्विक संकट आहे. भारतात देखील खेड्यांमध्ये देखील या विषाणूने हातपाय पसरविले आहे. मोठ्या प्रमाणात देखील ग्रामीण भागातील जनतेला ह्या विषाणूने गाठले आहे. सध्या या विषाणूपासून बचाव करण्याकरिता लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु शहरात जाऊन लस घेण्याकरिता पैसे नसल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ लसीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. परंतु चंद्रपूर तालुक्यातील नकोडा- मार्डा जिल्हा परिषद क्षेत्र याला अपवाद ठरले आहे. पिपरी येथील माजी सरपंच पारस पिंपळकर या तरुणाने स्वखर्चातून चक्क २०० वयोवृद्ध ग्रामस्थांना वीस किमी अंतरावर असलेल्या घुग्घूस येथे नेऊन त्यांना लस घेण्यास सहकार्य केले. या तरुणाच्या आदर्श घेऊन अन्य ठिकाणी देखील लोकांनी पुढे येऊन समाजातील लोकांना अशा प्रकारे मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
एक तरुण तुमच्या माझा सारखा. घरात ना राजकारणाच्या छंद …
ना गंध परंतु याला मात्र समाज सेवेची गावातील राजकारणात सक्रिय होऊन काही करण्याची धडपड. गावात सुरवातीपासून मुरलेल्या लोकांनी सत्ता कांबीज केली होती. परंतु याच्या स्वाहभवातील मधुरपणा हेच याचे यशाचे गमक होय. सर्वांसोबत मैत्री पूर्ण संबंध गावात विकासाचे राजकारण करून तालुक्यातून माझं गाव विकसत मोठं व्हावं हेच त्याच ध्येय असत. त्यासोबतच तो गावात फक्त राजकारणात न करता फक्त सरपंच पदावरच समाधानी न राहता नेहमी गावाच्या विकासा साठी असणारी त्याची तळमळ दिसून येते. त्याच्या राजकारणात सोबतच समाज कर्णातील कार्य अनेक युवकांना पेरणादायी व मोठं मोठ्या पुढार्यांना लाजवेल अशीच त्याची कार्य पद्धती आहे. असा हा पिपरीचा पारस पिंपळकर हा संपूर्ण तालुक्यात युवकांच्या मार्गदर्शक म्हणून समोर आला आहे.
गाव म्हंटल कि मोठे राजकारण डोळ्यासमोर येथे. मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात येते. त्यामध्ये रक्ताचे नाते देखील दुरावल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. परंतु निवडणुकी पुरात राजकारण बाकी वेळी समाजकारण हे सूत्र डोळ्यासमोर ठेऊन या तरुणाने पुढे येत हे कार्य केले आहे. सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित केले आहे. हि लस देताना त्याने कोणताच दुजाभाव केलेला नाही. महत्वाचं म्हणजे मागील वर्षी त्याने कोरोना काळात ज्या महिलांनी कार्य केले त्या महिलांना त्यांनी साडी देऊन त्यांना सन्मानित केले. अशा या राजकारणातील ध्येयवेड्या तरुणाचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.