चंद्रपूर : शुक्रवारला सकाळी दरम्यान घुग्घुस येथील शांतीनगर येथे राहणारी एक वयोवृद्ध महिला शौचालयास एकटीच घराबाहेर गेली असता येथील आरोपी मोहम्मद यासिन नूर इस्लाम शेख या 22 वर्षीय युवकाने संधीचा फायदा घेत अमानुष अत्याचार केला.
अश्या मानसिक विकृतीच्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनच्या सहा.पो.नि. मेघा गोखरे यांना निवेदनातून केली आहे.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारच्या घटनामध्ये वाढ होत आहे. अश्या घटना वारंवार घडत आहे. आज पर्यंत मोठया शहरात अश्या घटना घडायच्या परंतु आता घुग्घुस सारख्या छोट्या शहरात अश्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडायला लागल्या आहे. त्यामुळे घुग्घुस मधील महिला सुरक्षित नाही. अश्या विकृतींना आळा घालण्यासाठी अश्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी असे घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे यावेळी म्हणाल्या.
निवेदन देतांना घुग्घुसच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. सुचिता लुटे, घुग्घुस प्रयास सखी मंचच्या सौ. पुष्पाताई रामटेके, नजमा कुरेशी, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, पायल मांदाडे उपस्थित होत्या.