24 घंटे चौकन्ना, राजू अन्नाचं टीमवर्क पोलिसांपेक्षा भारी…

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या वेकोलीच्या भालर वसाहती मधून देशी दारूचा अवैध पुरवठा राजरोसपणे होत आहे, हा पुरवठा मात्र शिस्तीने होत आहे बर का, कारण हा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार राजू अन्ना यांनी 15 जणांची टीम बनवली आहे, आणि ह्या टीमवर्क मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील देशी दारू भालर वसाहतीमधून येत आहे.

या वसाहती जवळ दीपक ट्रेडर्स नामक देशी दारूची भट्टी आहे, या भट्टीतून अवैध देशी दारूचा पुरवठा चंद्रपुरात केल्या जातो, इतकेच नव्हे तर यासाठी एकमेव मार्ग म्हणजे घुग्घूस जवळील बेलोरा पूल याचा उपयोग केला जातो.
मात्र ही दारू कोणताही पोलीसवाला अडवीत नाही हे विशेष.
राजू अन्ना हा आपल्या 15 मुलांच्या टीमला ही देशी दारू कोणत्या मार्गे व कुणी अडविल्यास काय करायचे याची खातरजमा करतात.
आश्चर्याची बाब म्हणजे हा संपूर्ण दारू साठा घुग्घूस मार्गाने चंद्रपुरात दाखल होतो.
घुग्घूस पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचं या अवैध दारु वाहतुकीवर व अवैध दारू नियंत्रणात मुळीच लक्ष नाही.
आज घुग्घूस शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूचा पुरवठा होत आहे, त्यावर पोलीस प्रशासनानी त्या अन्नाचा माल 24 घंटे चौकन्ना राहून पकडण्यात यावा.