गुप्तधन काढायचयं तर द्या मग अडीच लाख

0
454
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जर आपल्या घरी गुप्तधन असेल. ते शोधून काढायचे असेल तर आपल्याला त्याचा खर्च अडीच लाखांचा पडेल. विश्वास बसणार नाही पण होय हे सतय आहे. चंद्रपूरात काल शनिवारी अशीच एक घटना उघडकीस आली. चंद्रपूर जवळील गोंडसावरी येथे रविंद्र पेंदोर या व्यक्तीची गुप्तधन काढण्यासाठी फसवणुक केली आहे.

एका बोगस आयुर्वेदीक डॉक्टरसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. जिल्हयात गुप्धनधन शोधणारी टोळी असल्याची यात अशी एक घटना येईल. आयुर्वेदिक डॉक्टर अजय पडियाल व सागर पडियाल असे आरोपींचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्हयात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गोंडसावरी येथील येथील रवींद्र पेंदोर यांचे घरी गुप्तधन आहे. ते काढायचे असेल तर आम्ही काढून देवू, एक पुजा करावी लागते. त्याकरिता अडीच लाखांचा खर्च येतो. गुप्तधन काढून शार्टकटने लखपती बनण्यासाठी कुणीही नाही म्हणणार नाही त्यामुळे फिर्यादी रविंद्र पेंदोर तयार झालेत. आरोपींना अडीच लाख देण्याचे ठरले. आणि ॲडव्हॉन्स म्हणून 45 हजार रूपये त्यांना दिले.उर्वरिता 2 लाख रूपये बाकी होते. मात्र आरोपींनी गुप्तधन काढून न देता उर्वरित रक्कम चंद्रपूरात इंदिरानगर येथे येवून तात्काळ देण्यासाठी फिर्यादीकडे तगादा लावला. बोगस आयुर्वेदीक डॉक्टर म्हणवणाऱ्या आरोपींसह दोघांच्या हाचलाचींवर संशय आल्याने फियादीने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
प्रकरण गुपतधनाचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले. तुमच्या घरी गुप्तधन आहे, बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी विशिष्ट पूजा करावी लागते आणि याकरिता पूजेला तब्बल अडीच लाखांचा खर्च येतो, अशा चर्चा जिल्ह्यात ऐकू येत असल्याची शहानिशा केली. गुप्तधनासाठी भेाळ्याभाबळ्या नागरिकांना लुबाडण्याचे प्रकारही ग्रामीण भागात वाढले असल्याचे स्थानिक गुन्हेला काही पुराव्यावरून लक्षात आले. काल शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सागर पडियाल ला अटक केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर व पूजा करणारे महाराज ग्रामीण भागात नागरिकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यामुळे या घटनेत बोगस आयुर्वेदीक डॉक्टरसह दोघांना अटक करून गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे गुप्तधनाच्या नावावर होणारी अनेक नागरिकांची फसवणूक थांबविता आली आहे. फिर्यादी मार्फत मूल येथे तक्रार दाखल केली असअून पुढील तपास मूल पोलीसांकडे दिला आहे.