चंद्रपूर : शासनाने ठरवून दिलेल्या दारांपेक्षा पेक्षा अधिक दर आकारणी करून कोविड रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या चंद्रपूर शहरातील डॉ. रितेश दीक्षित यांच्या श्वेता हॉस्पिटल च्या कोविड केअर सेंटर ची मान्यता परवानगी आज गुरुवारी मनपा प्रशासनाने रद्द कारवाई केल्याने शहरातील वैद्यकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले, शहरापासून गावाखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले.रुग्णांना वेळेत उपचार मिळावा याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचार करण्याची परवानगी दिली.त्यानुसार श्वेता हॉस्पिटल ला सुद्धा परवानगी देण्यात आली होती.
डॉ. रितेश दीक्षित हे कोविड रुग्णांवर उपचार करीत होते. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या अधिकची रक्कम घेण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला असता जिल्ह्यात सर्वत्र टिकेची झोड उठली होती.त्यानंतर डॉ. दीक्षित व रुग्णांच्या नातेवाईकांत झालेली खडजंगी ही वायरल झाली होती.
श्वेता हॉस्पिटल च्या या आर्थिक पिळवणूक समोर येताच खा. बाळू धानोरकर यांनीही डॉ. दीक्षित यांच्या कोविड केअर सेंटर ची परवानगी रद्द करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्याकडे केली होती.
तरीही डॉ. दीक्षित एवढ्यावरच न थांबता शहरातील समाजसेविका वंदना हाथगावकर यांच्या कुटुंबियांकडूनही तीन दिवसांचे 1लाख 700रुपयांचे बिल आकारण्यात आले असता त्यांनी मनपा प्रशासनास याची तक्रार दिली होती.या तक्रारीच्या चौकशीत मनपा ने केलेल्या ऑडिट मध्ये हाथगावकर यांच्याकडून तब्बल 34हजार 700 रुपये जास्तीचे घेण्यात आल्याचे आढळले.
या संबंधिचे वृत अनेक माध्यमांनी प्रसारित केले होते.या सर्व प्रकाराची मनपा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत श्वेता हॉस्पिटल ची परवानगी रद्द करण्यात आल्याचे व आज गुरुवारी यासंबंधिचे पत्र हॉस्पिटल ला पाठविण्यात आले असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यानी टीम खबरकट्टा ला कळविले आहे.