डब्ल्यू सि एल कडून कामगारांचे शोषण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• न्यायाकरिता कामगारांचे घुग्घुस काँग्रेसकडे  धाव

चंद्रपूर : वेकोलिच्या सब एरिया घुग्घूसमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण करण्यात येत असून यामुळे कामगारांना जीवन जगणे कठीण झाले आहे. शोषीत कामगारांवरील अन्याय दूर व्हावा या करिता कामगारांनी घुग्घूस काॅंग्रेसकडे धाव घेतली आहे.

वेकोलीच्या सब एरिया घुग्घुस येथे कोल टेस्टिंग लॅब मध्ये मागील पांच वर्षांपासून कोटेनका सॅम्पलिंग घुग्घुस सायडिंग अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या पाच वर्षापासून शोषण होत असून कामगारांना कोल इंडिया जॉईंट कमिटी W.E.F. निर्धारित वेतन 939 तथा 975 न देता त्यांना अन्य उद्योगाचे किमान वेतन जवळपास 430 ते 450 पर्यंत देण्यात येते व याव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साधने व अन्य सोयी सुविधा देण्यात येत नाही तीस दिवस काम केल्यानंतर 26 दिवसाचाच वेतन दिल्या जाते आठवडी रजेचे वेतन देण्यात येत नाही.

यापूर्वी कामगारांनी अनेक संघटना व नेत्यांकडे दाद मांगीतली मात्र न्याय न मिळाल्याने राजूरेड्डी, सैय्यद अनवर यांची भेट घेवून न्याय मिळवून देण्या संदर्भात विनवणी केली.

येत्या काही दिवसातच कामगारांच्या मागण्याचा पूर्णतः अभ्यास करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार काँग्रेस नेते राजूरेड्डी यांनी व्यक्त केला.