BREAKING : ग्रामपंचायत सचिव धवणे 4 हजाराची लाच घेताना रंगे हात अटक

0
1826
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोसारा ग्रामपंचायतचे सचिव अभय धवणे यांना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास भ्रष्टाचार निरोधक विभागाने चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

दुर्गापूरला राहणार कुणाल सातपुते यांचा प्लाट कोसारा ग्रामपंचायत अंतर्गत येतो घराच्या बांधकामा करीता तसेच इलेक्ट्रिक मीटर करिता ना हरकत परवानगी साठी अर्ज केला होता.

सदर कामासाठी अभय धवणे यांनी पांच हजार रुपये लाच स्वरूपात मागितले सातपुते यांनी विनवणी केल्यानंतर चार हजार रुपयात परवानगी देण्यास सचिव तैयार झाले यानंतर सातपुते यांनी ACB ला तक्रार दिल्या नंतर ACB अधिकारी निलेश सतुटकर सापळा रचून धवणे यांना अटक केली.