चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक; 9 मृत्यू तर 668 पॉझिटिव्ह

0
165
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• चंद्रपूर मनपा क्षेत्र, वरोरा आणि भद्रावतीमध्ये रूग्णसंख्या वाढली
• गत 24 तासात 218 कोरोनामुक्त
• ॲक्टीव पॉझिटिव्ह 3794

चंद्रपुरात दरदिवशी कारोना बाधित आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. काल बुधवारी पाच मृत्यूचा आकडा आज गुरूवारी दुप्पटीने वाढला आहे. चंद्रपुरातही कारोनाचा उद्रेक होताना दिसतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दैनंदिन वाढणारा बाधितांचा आणि मृत्यूचा आकडा जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे वतीने कोविड बाबत घालून दिलेल्या नियमांचे कडक अंमलबजावणीसाठी पाऊले उचलले जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 918 झाली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 56 हजार 203 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील 36 वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील 40 वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील 80 वर्षीय महिला, नागभीड येथील 67 वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील 52 वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 50 वर्षे महिला, वरोरा शहरातील 60 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 456 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 413, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 668 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 175, चंद्रपूर तालुका 50, बल्लारपूर 36, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 21, नागभिड 31, सिंदेवाही नऊ, मूल 37, सावली 23, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी दोन, राजूरा 25, चिमूर 39, वरोरा 133, कोरपना 37, जीवती दोन व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हजणे चंद्रपूर महानगर पालिका, वरोरा आणि भद्रावती येथे बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे याकरिता जिल्हा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.