चंद्रपुरात वाघाच्या अवयंवापासून कजली काढण्याचा प्रयत्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• नैसर्गीकरित्या मृत्यू झालेल्या वाघाचे काढले अवयव

चंद्रपूर : नैसर्गीकरित्या मृत पावलेल्या वाघाच्या शरीरावरील अवयव काढून मांत्रिकांद्वारे त्यापासून कजली काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना वनविभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपींना आज मंगळवारी (8जून) ला न्यायालयात हजर करून आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागेंद्र किसन वाकडे रा. धानोरा व सोनल अशोक धाडसे रा. तिरखुरा असे आरोपींचे नाव आहे. या घटनेने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रं. 261 मध्ये एका पट्टेदार वाघाचा नैसर्गीकरित्या मृत्यू झाला. दोन्ही आरोपी हे या परिसरातील जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता. त्यांना मृत वाघ आढळून आला. त्यांनी वाघाच्या शरीरावरील 11 नखे, संपूर्ण दातव मिश्या आरोपींनी काढून कजली काढण्याच्या उदेश्याने एका मांत्रिकाला दिले. या घटनेची चर्चा या परिसरात सुरू झाल्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांना ही माहिती मिळाली. त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे या बाबत खात्री करून आरोपी नागेंद्र किसन वाकडे रा. धानोरा व सोनल अशोक धाडसे रा. तिरखुरा यांना काल सोमवारी ताब्यात घेतले. त्यांनतर सदर प्रकरणाची चौकशी केली असता आरोपींनी या प्रकरणाची कबूली दिली.

आरोपींनी दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी त्यांना सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रं. 261 मध्ये घटनास्थळी घेऊन आणण्यात आले. घटनास्थळी वाघाचा मृत शरीर आढळून आला. त्यावर 11 नखे, संपूर्ण दात व मिश्या वगळता उर्वरित शरीर शाबूत होता. सदर घटनास्थळावरील वाघाच्या मृत शरीराची चौकशी केल्यांनतर पंचनामाअंती वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे उर्वरित शरीर जाळण्यात आले. त्यांनतर ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. सदर आरोपींनी वाघाच्या शरीरावरील अवयव स्वत:जवळ असल्याची कबूली दिली. आरोपींकडून वाघाचे 11 नखे, मिश्यांचे 16 केस, दाते लहान 4, हाडे 4 असे अवयव ताब्यात घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण (अधिनियम) 1972 कलम 2, 39,48,50,51,57 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सदर आरोपींनी पटटेदार वाघाच्या काढलेल्या शरीरावरील अवयवांचा वापर कजली काढण्यासाठी करण्यात आल्याची माहिती समोरे आली आहे. चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर आरोनींची कसून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या अधिकाऱ्यांपुढे राहणार आहे. या प्रकरणाचा तपास ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, उपविभागीय पोलिस अधिकारी तारे, सहायक वनसंरक्षक श्रीमती बोंगाळे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी गोंड, गायकवाड, ब्राम्हणे करीत आहेत.