वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ” सूरज ” अस्त; बल्लारपूर येथील थरारक घटना

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते तसेच कोळसा व दारू तस्कर सूरज बहुरीया यांचा 09 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्यानिमित्त संपूर्ण शहर भर शुभेच्छा देणारे फलेक्स बॅनर लावण्यात आले.
समर्थका तर्फे वाढदिवसाची जय्यत तैयारी करण्यात येत असताना आज दिनांक 08 ऑगस्ट रोजी जुना बस स्टँड परिसरातुन चारचाकी वाहनातून बामणी कडे जात असतांना सुरज बहुरीया यांच्यावर भर चौकात दुपारी 03 वाजता गोळीबार करण्यात आला.
यात सूरज यांचा मृत्यू झाला दोन आरोपीने पोलिसात आत्मसमर्पण केल्याचे कळताच समर्थकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली व आरोपींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता.
पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगविली या घटनेचे संतप्त प्रतिसाद शहरात उमटले असून कोळसा व दारूच्या अवैध व्यवसायाच्या वर्चस्वातुन हे हत्याकांड घडलेले असून हे वाढते गँगवार चिंतेचा विषय झाला आहे.
वाढदिवसाचा आनंद हा शोकात बुडाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.