• जेसानी कुटुंबातील आठ जणांवर गुन्हे दाखल
चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जेसानी परिवाराने सुनेचा पैशासाठी छळ केल्याची तक्रार सून नगमा हिने ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे केल्याने तक्रारीची दखल घेत कौटुंबिक हिंसाचार व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा मुलगा मंजर शाकीर अली जेसानी आणि चिमुर येथील प्रतिष्ठित व्यापारी सलिम युसफ अजानी यांची मुलगी नगमा हिच्याशी रितीरिवाजा प्रमाणे १५ नोव्हेंबर २०११ ला ब्रम्हपूरी येथे विवाह पार पडला. परंतु लग्नाच्या एक वर्षानंतर मंजर व त्याच्या आई-वडिलांचे वर्तण नगमा सोबत छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद होऊ लागले. नगमा ला दोन मुले असून मोठा मुलगा अर्मान आणि लहान मुलगा अलीना असुन नगमा च्या वडिलांनी रितीरिवाजा प्रमाणे सोने व इतर समान दिले.पण पती मंजर जेसानी नेहमी मला पैस्याची अडचण आहे असे म्हणायचे. आपल्या माहेर वरून पैसे आण्यासाठी तगादा लावायचा. माझा संसार उद्धवस्त होऊ नये म्हणून आता पर्यंत वडिलां कडुन तीन लाख रुपये मागितले. परंतु मंजर च्या मनात वेगळेच चालले होते कोणतीतरी अडचण सांगून नगमा कडे वारंवार पैशासाठी तगादा लावत होता. आपल्या वडिलांकडून चाळीस लाख रुपये आण असा तगादा लावून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रार नगमा यांनी पती,सासू, सासरे चुलत सासरे यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत.पती मंजर जेसानी,सासु दिलशाद जेसानी,सासरे शाकीर जेसानी,चुलत सासरे ईमरान जेसानी,चुलत सासरे शाबीर जेसानी,मोठा सासरे इकबाल जेसानी, यांनी मला वडिलांकडून चाळीस लाख रुपये आण असे ताकदा लावला व पैसे नाही दिले म्हनुन माझ्या आई-वडिलांचा शारीरिक व मानसिक छळ केला असुन सदर प्रकरण कौटुंबिक हिंसाचार व हुंडा प्रतिबंधक कायदा अर्तगंत कलम,४९८A,३२३,३४,४ कलमा अर्तगंत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.